उद्धव ठाकरेंचे सचिव पैसे घेऊन पदे विकतात शिंदेसेना -भाजपचा आरोप

मुंबई: विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे पीए रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले. म्हात्रे हे पैसे घेऊन पदे विकत असल्याचा आरोप संजय शिरसाट, निरुपम आणि शेलार यांनी केल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.
गेल्या पंधरा-वीस वर्षात ज्या - ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली त्या सर्वांनीच शिवसेनेत खास करून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नजीकच्या लोकांकडून निवडणुकीत पैसे घेऊन तिकीट विकले जात असल्याचे आरोप केलेले आहेत. यात नारायण राणेंपासून तर राज ठाकरे या अनेक नेत्यांचा समावेश आहे. पैसे घेऊन विधानसभेचे किंवा महापालिकेचे तिकीट दिले जाते, असे आरोप करूनच राज ठाकरे देखील बाहेर पडले होते. या सर्व नेत्यांच्या रडारवर खासकरून उद्धव ठाकरे होते.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि विरोधकांना अंगावर घेत शिवसेनेचा किल्ला लढवत असलेले संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी अत्यंत गंभीर आरोप केला. त्यांनी थेटच रवी म्हात्रे आणि विनायक राऊत या दोघांचा नामोल्लेख केला. विनायक राऊत हे उद्धव सेनेचे सचिव आहेत तर रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आहेत.
संजय शिरसाट यांनी आरोप केला की विनायक राऊत यांच्या मदतीने रवी म्हात्रे हे पैसे घेऊन पक्षातील लोकांना पदे विकत आहेत. 'पैसे आणा आणि पदे घ्या' ही कार्यपद्धती सध्या उद्धवसेनेत सुरू असल्याचा आरोप देखील संजय शिरसाट यांनी केला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनीही शिरसाट यांच्या आरोपांची पुष्टी केली. निरुपम यांनी आरोप केला की, उबाठा पैसे घेऊन काँग्रेस आणि शरद पवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजपचे आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शिवसेनेच्या दाव्याला समर्थन दिले. पैसे दो पैसे लो याच कामासाठी विनायक राऊत आणि रवी म्हात्रे पूर्वीपासून (कु) प्रसिद्ध असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला.
शिरसाट यांच्या या आरोपाला अद्याप तरी उद्धव सेनेकडून कोणीही प्रत्युत्तर दिलेले नाही. याचाच अर्थ उद्धवसेनेत सारे काही आलबेल नाही, हे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत देखील विनायक राऊत यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचे आरोप झाले होते. त्या आरोपांवर देखील उद्धव ठाकरेंकडून कुठलीही चौकशी करण्यात आली नाही.
उद्धव सेनेच्या महिला पदाधिकारी देखील पैसे घेतात, असा थेटच आरोप संजय शिरसाट यांनी केला. त्यांनी नामोल्लेख केला नसला तरी त्यांचा इशारा उद्धवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याकडे असल्याचे म्हटले जाते. अंधारे या पैसे घेऊन पदे देतात, असा आरोप बीडचे उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. त्यावेळीही या आरोपांची चौकशी उद्धव सेनेकडून करण्यात आली नाही, याउलट जाधव यांना पक्षातून निलंबित करण्यात येऊन अंधारे यांचा बचाव करण्यात आला होता.

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...
नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...
मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...
भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...
मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला
वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
Stay Connected
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...