गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू

वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा (लक्झरी क्रुझचा) आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे अंतर्गत मेजवानी बोट सफर शनिवार पासून सुरू करण्यात आली आहे. आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते या पार्टी क्रुझचं शानदार सोहळ्यात शुभारंभ करण्यात आला. एक तासांच्या या सफरीत नृत्य, संगीताच्या तालावर समुद्र सफरीचा आनंद घेता येणार आहे. वसई आणि भाईंदर खाडी दरम्यान फेब्रुवारी महिन्यापासून रोरो सेवा सुरू करण्यात आली होती. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत चालवल्या जाणार्या या रोरो सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. वसईहून भाईंदर मार्गे मुंबईला जाणे सोपे झाल्याने नागरिक रोरो सेवेला पसंदी देत आहे. या प्रतिसादामुळे आता महाराष्ट्र सागरी मंडळाने (मेरीटाईम बोर्डाने) खाडीत आरामदायी पार्टी क्रुझ सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शनिवारी संध्याकाळी नालासोपार्याचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते या फेरी की सवारीचा शुभारंभ करण्यात आला. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्विसेस कंपनीतर्फे ‘फेरी की सवारी’ या नावाने पार्टी क्रुझ सुरू झाली आहे. या पार्टी क्रुझमुळे वसईच्या पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केला.यावेळी माजी स्थायी समिती सभापती अफीफ शेख, माजी नगरसेवक हार्दीक राऊत, ऋषित दवे, प्रितेश पाटील, यशोधन ठाकूर, आशिष वर्तक, सनी मोसेकर आदी उपस्थित होते. टॉम ब्रदर्सतर्फे या पार्टी क्रुझचं व्यवस्थापन केले जाणार आहे.
या पार्टी क्रुझ बाबत माहिती देताना संचालिका सुयशा तांबोरे यांनी सांगितले की, वाढदिवस, कोटुंबिक सोहळे, मेजवान्या आदींसाठी ही ‘पार्टी क्रुझ’ तयार करण्यात आली आहे. दिवसातून या फेरी की सवारीच्या एकूण तीन फेर्या असणार आहे. संध्याकाळी भाईंदरवर ४ ते ५ या कालावधीत एक फेरी असेल. तर वसई ते भाईंदर अशी संध्याकाळी ५:३० ते ६:३० आणि ६:३० ते ७:३० अशा दोन फेर्या असतील. प्रत्येक फेरी ही १ तासांची असेल. या पार्टी क्रुझ मध्ये एकूण तीन भाग आहेत. खालील भाग (लो डेस्क) दिडशे रुपये प्रति माणसी ठेवण्यात आला आहे. मधला डेस्ट हा कुटुंबासाठी (फॅमिली सेक्शन) आहे. त्यात प्रत्येक ४ जणांसाठी १८०० रुपयांचा दर आहे. ज्यात ३०० रुपयांचा स्नॅक्स दिला जाणार आहे. वरील भाग हा प्रिमियर डेस्क आहे. ज्यात ४०० रुपये प्रति माणसी असा दर आहे. ज्या मध्ये प्रत्येकाला १०० रुपयांचे स्नॅक्स दिले जाणार आहे. ज्याला पुर्ण डेस्क हवा असेल त्याला २५ माणसांचे आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. या मेजवानी बोर्टीत संगीत, डिजे, नृत्य आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे.
फेरी की सवारीच्या ३ फेर्या झाल्यानंतर रात्री भाईंदरच्या किनार्यावर तरंगते रेस्टॉरंट (फ्लोटिंग रेस्टॉरंट) सुरू केले जाणार आहे. रात्री ८ ते ११ अशा वेळेत समुद्रात नागरिकांना जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. त्यात मेजवानी आणि सोहळे देखील आयोजित केले जाणार आहे. वसईच्या किनारपट्टीवर निसर्ग, चविष्ट माशांची मेजवानी आहे. मात्र गोव्याप्रमाणे आरामदायी बोट (लक्झरी) सेवा नाही. त्यामुळे आम्ही ही फेरी की सवारी सुरू केली आहे, अत्यंत किफायतशीर अशी ही सेवा असून सर्वसामान्य माणसांना त्याचे दर परवडतील असे संचालक अभय तामोरे यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...
नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...
मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...
भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...
मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला
वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
Stay Connected
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...