नालासोपार्यातील विद्यार्थींनिवर बलात्कार प्रकरण आरोपींच्या कलमांत वाढ, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

वसई- नालासोपारा येथील अवधेश विकास यादव शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकऱणाातील आरोपींवर अखेर कलमे वाढविण्यात आली आहे. याप्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकाविरोधात कलम वाढविण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन येथे यादवेश विकास इंग्रजी शाळा आहे. या शाळेत ९ वीत शिकणार्या १४ वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतील शिक्षक अमित दुबे याने हा मागील ५ महिन्यांपासून धमकावून बलात्कार करत होता. पोलिसांनी त्याच्यावर बलात्कारा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली होती. परंतु शाळेचा मुख्याध्यापक विकास यादव आणि पर्यवेक्षख संतालाल यादाव यांनी हा प्रकार दडवला होता. २०२२ मध्ये दुबे पीडित मुलीचा लैंगिक छळ करत होता. हा प्रकार पीडित मुलीने पर्यवेक्षक संतलाल यादव आणि मुख्याध्यापक विकास यादव यांना सांगितला होता. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याबाबत पीडित मुलीचा भाऊ विचारणा करण्यासाठी गेला असताना त्याला मुख्याध्यापक विकास यादव याने मारहाण केली होती. आता देखील बलात्काराची घटना घडल्यानंतर या दोघांनी प्रकरण मिटविण्यास सांगितले होते. जनक्षोभानंतर पेल्हार पोलिसांनी फिर्यादी मुलीचा नव्याने पुरवणी जबाब नोंदवून मुख्याध्यापक विकास यादव आणि पर्यवेक्षक संतलाल यादव याच्याविरोधात पोक्सोच्या कलम २१ (२), आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२) ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
मात्र ही कलमे किरकोळ असून या मध्ये केवळ २ वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याने त्यांना अटक करता येत नव्हती. यामुळे शिवसेना ठाकरे गटाने कलम वाढविण्यात यावीत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. शिवसेनेच्या या मागणीला यश आले आणि पोलिासंनी कलमांत वाढ केली. मुख्याध्यापक आणि पर्यवक्षेकाविरोधात आता कलम १७ आणि १९ ची वाढ करण्यात आली आहे.
पोलिसांनी कलमे वाढवली ही समाधानाची बाब आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची आमची मागणी कायम आहे. शाळा अनधिकृत असून त्यावर कारवाईसाठी आमचा लढा चालूच राहणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सरचिटणीस ॲड अनिल चव्हाण यांनी सांगितले. आरोपी अमित दुबे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा आम्ही सखोल तपसा करत आहोत अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक जावेद मुल्ला यांनी दिली.

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...
नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...
मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...
भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...
मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला
वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
Stay Connected
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...