top_advertise_img

महाराष्ट्रातील युवक-युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी! राज्य सरकार व बाडेन-युटेनबर्गमध्ये सामंजस्य करार कुशल वाहनचालक पुरविण्याची जबाबदारी परिवहन विभागाची!

By The Journalists
महाराष्ट्रातील युवक-युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी!  राज्य सरकार व बाडेन-युटेनबर्गमध्ये सामंजस्य करार  कुशल वाहनचालक पुरविण्याची जबाबदारी परिवहन विभागाची!

विरार :  महाराष्ट्रातील कुशल-अकुशल बेरोजगार युवक-युवतींना जर्मनी येथे अधिकृतरीत्या वाहनचालक म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 10 हजार युवक-युवतींना जर्मनीत पाठविण्याचा राज्य सरकारचा संकल्प असून; त्या दृष्टीने राज्य सरकारने योजना आखली आहे. त्यापुढील टप्प्यात यासह इतर क्षेत्रांतील कौशल्यधारकांनाही मोठ्या संख्येने ही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे; जर्मन भाषेचे प्रशिक्षण आणि आवश्यक कौशल्य सुधारणेचे निवासी मोफत प्रशिक्षण युवक-युवतींना त्यांच्याच जिल्ह्यात दिले जाणार आहे. याशिवाय जर्मनी येथे लागणारी सुरुवातीच्या काळातील मदतही महाराष्ट्र शासनाकडून दिली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई येथून देण्यात आली.

जर्मनी देशातील बाडेन-युटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातून विविध क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत 25 फेब्रुवारी 2024 रोजी सामंजस्य करार झाला आहे. यात प्रामुख्याने वाहनचालकांचा समावेश आहे. सदर कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याची जबाबदारी परिवहन विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे. शासन निर्णयानुसार, मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्था व कार्यपद्धती निश्चित करण्यास शासन मान्यता देणण्यात आली आहे. तसेच याकरता जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व तांत्रिक समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. यापैकी राज्यस्तरीय सनियंत्रण समितीत परिवहन आयुक्त सदस्य आहेत. तसेच उमेदवारांना आवश्यकतेनुसार कौशल्य वृद्धीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेडनिहाय तांत्रिक समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. यात परिवहन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली वाहनचालक (बस, रेल्वे, ट्रक, हलकी व जड वाहने) या ट्रेडकरता समिती गठित करण्यात आलेली आहे.

कुशल वाहनचालक पुरविण्याची जबाबदारी परिवहन विभागाची!

या पार्श्वभूमीवर शासन निर्णय (क्र. कौशल्य 2024/प्र.क्र.51/एसडी-6 दिनांक 11 जुलै 2024)मधील कराराप्रमाणे बाडेन-यूटेनबर्ग या राज्यास कुशल वाहनचालक पुरविण्याची कार्यवाही परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांस जर्मन भाषा येणे अनिवार्य असल्याने सदर जर्मन भाषा प्रशिक्षणाची कार्यवाही शासनामार्फत करण्यात येणार आहे. शासन निर्णयात दिल्यानुसार उमेदवाराचा सर्व खर्च शासन करणार आहे.

जर्मनी व भारत या दोन्ही देशांतील वाहन चालकांकरिता असलेले नियम व अभ्यासक्रम तसेच इतर अनुषंगिक यात तफावत  आहे. त्यामुळे उमेदवारास आवश्यक प्रशिक्षण (लेफ्ट हँड ड्राईव्ह इत्यादी) देण्याबाबतची कार्यवाही व खर्चदेखील शासन स्तरावरून केली जाणार आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. त्याचा संकेतांक 202407111515455821 असा आहे. सदर प्रकल्पांतर्गत जर्मनीत जाण्यासाठी इच्छुक वाहनचालकांनी शासनामार्फत जारी करण्यात आलेले क्यूआर कोडवर स्कॅन करून त्यावर दिलेल्या प्रवेश प्रक्रियाबाबतचा अर्ज भरावा. ऑनलाईन नोंदणी करण्याकरता http://https.www.maa.ac.in/GermanyEmployment या शासकीय संकेतस्थळाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई यांनी केले आहे.

दरम्यान; ही योजना शासकीय आहे. त्यामुळे योजना राबविण्याकरता कोणत्याही संस्थेची किंवा व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली नाही. कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने या योजनेच्या लाभाकरता संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याला बळी पडू नये. किंबहुना अर्ज भरताना तांत्रिक अडचण आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय-वसई कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आलेले आहे.

राष्ट्रीय
सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक  - ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...

नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई
मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा सोना जप्त

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...

मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण, सरकारकडे मदतीची मागणी

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...

भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक

मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीनांचा मृत्यू

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...

मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसई विरार
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...

वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...

वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला

वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Sports
...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

More Local News To You

Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.

Trending In Business
Trending In Business

Stay Connected

top-ad-banner
For You
वसई विरार
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...

वसई विरार
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार

वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...

वसई विरार
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू

वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...