महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज - पंतप्रधान

नवी दिल्ली : आज महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज आहे. देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे, असा माझा विश्वास आहे. “विकसित महाराष्ट्र, विकसित भारत” हे उद्दिष्ट आपण सर्व मिळून साध्य करूया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण झाले. त्यानिमित्त ते बोलत होते. मोदी पुढे म्हणाले, गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती ही महाराष्ट्रातील युवावर्गासाठी आज मोठी शक्ती बनत आहे. आधुनिकीकरण देशाच्या मूलभूत तत्वांवर आधारित असले पाहिजे आणि भारत आपला समृद्ध वारसा पुढे नेत आधुनिक आणि विकसित होईल. भविष्याच्या दृष्टीने सज्ज अशा पायाभूत सेवासुविधा आणि विकासाचे लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि ज्यावेळी समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या यात्रेत सहभागी होईल तेव्हा ते प्रत्यक्षात साकार होऊ शकते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन झाले. त्यामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प (टप्पा-1) पूर्ण होत आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाचा खर्च सुमारे 1,810 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 2,955 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणाऱ्या पुणे मेट्रो टप्पा-1 च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणी करण्यात आली. सुमारे 5.46 किमी लांबीचा हा दक्षिणेकडील विस्तार मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह पूर्णपणे भूमिगत आहे. सरकारच्या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेस 20 किमी अंतरावर 7,855 एकर क्षेत्रावर पसरलेले बिडकीन औद्योगिक क्षेत्र पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत विकसित केलेल्या प्रकल्पात मराठवाडा विभागातील एक आर्थिक केंद्र म्हणून यात प्रचंड क्षमता आहे. एकूण 6,400 कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजूरी दिली असून तो तीन टप्प्यांमध्ये विकसित होणार आहे. पंतप्रधानांनी सोलापूर विमानतळाचेही उद्घाटन केले. या विमानतळामुळे संपर्क सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होतील आणि सोलापुरात जाणारे पर्यटक, तिथले व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी ते अधिक सोयीचे होईल. सुमारे 4.1 लाख प्रवाशांना (वार्षिक) सेवा देण्यासाठी सोलापूरच्या विद्यमान टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. भिडेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...
नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...
मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...
भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...
मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला
वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
Stay Connected
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...