मिरा भाईंदर क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीच्या “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे” मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे:मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीच्या “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळ्यात केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारतरत्न गानसम्राज्ञी मंगेशकर नाटयगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, मिरा-भाईंदर-वसई -विरार शहर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, शहर अभियंता दीपक खांबित, उपायुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त (मुख्यालय) संजय दोंदे, महापालिका अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांना आपण सुरक्षित आहोत असे वाटणे गरजे आहे. कोणत्याही प्रकारची भिती मनात वाटू नये. सी.सी.टीव्ही लाईव्ह फुटेज पाहता येणार आहे. यामुळे चुकीच्या प्रकाराला आळा बसणार आहे. विद्यार्थ्याची सुरक्षा महत्वाची आहे. शालेय शिक्षण विभागात नियम कडक करण्यात आले आहेत. सर्वांनी सावधगिरीने काम केले पाहिजे. आपले राज्य शिक्षण क्षेत्रात अन्य राज्यांच्या पुढे आहे. शालेय शिक्षणात आपल्या राज्याचे नाव अग्रेसर राहिले पाहिजे. महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया भक्कम केला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. शाळेमध्ये कर्मचारी नियुक्ती करताना त्यांची पार्श्वभूमी नीट तपासून घ्या. शाळांमध्ये शालेय तक्रार पेटी ठेवा. संस्था चालकांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडा. अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. “शक्ती” कायदा तयार करुन मंजूरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे. गुन्हेगाराला कायद्याची भीती वाटली पाहिजे. मुलींच्या सुरक्षेसाठी जे उपाय करणे गरजेचे आहेत ते करीत आहोत. आपण निर्भय-निश्चिंत राहा. सरकार तुमच्या पाठीशी आहे. आज शिक्षक दिन आहे. शिक्षक म्हणजे गुरुजन आहेत. शासनाच्यावतीने आपणाला जे लागेल ते आम्ही देवू. आपल्या शहराचे व देशाचे नाव मोठे करा. महिला पोलिसांनी शाळांमधून नियमित गस्त वाढवायला हवी.
यावेळी प्रास्ताविकात आयुक्त संजय काटकर म्हणाले की, 12 लाख लोकसंख्या असणारे मिरा-भाईंदर महानगर आहे. महानगरपालिकांच्या 36 शाळा आहेत. 10 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मिरा-भाईंदर महानगरपालिका शाळांमध्ये 200 सी.सी टीव्ही बसविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देण्यात येत आहे. 1 ते 10 वी पर्यंत शिक्षण मोफत आहे. फुटेजची नेहमी तपासणी करणे. चुकीचा प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. सी.सी.टीव्ही " बसविण्याची नियम खाजगी शाळांना सुध्दा लागू आहे. तशा त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार व आयुक्त श्री. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष सुरू झाला असून या कक्षाद्वारे विद्यार्थांच्या विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षितेचा प्रश्न अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्यासाठी उचलले महत्त्वाचे पाऊल आहे.
अत्याधुनिक सर्व्हर आणि विशेष कार्यप्रणालीयुक्त असा यु.पी.एस. जनरेटर बॅकअप असलेल्या नियंत्रण कक्षात एकाच वेळी साधारण एक हजार सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांवर नजर ठेवणारी अद्यावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या कक्षात संगणक, व्हीडिओ वॉल, सभाकक्ष, एक बॅकअप सर्व्हर, देखरेख ठेवण्यासाठी असलेले अधिकारी व कर्मचारी आणि प्रशस्त वातानुकूलित जागा असलेल्या या कक्षात सद्य:स्थितीत मनपा शाळा यांच्यावर लक्ष केंद्रित केले असून भविष्यात मिरा भाईंदर शहरातील सर्व खाजगी शाळेतील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुद्धा या उपक्रमात समाविष्ट करण्यात येतील. या नियत्रंण कक्षात कार्यरत असलेले पथक मनपा शाळेतील सीसीटीव्ही फुटेज सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तपासण्याचे व त्याचे जतन करण्याचे काम करतील. मिरा भाईंदर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उचललेल्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे भविष्यात घडणाऱ्या अनुचित घटनांवर कायमस्वरूपी आळा बसून हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्यात नक्कीच मदत होणार आहे.

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...
नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...
मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...
भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...
मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला
वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
Stay Connected
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...