top_advertise_img

मुंबई विभागातून ८०० भाविक अयोध्येकडे रवाना , तीर्थदर्शनातून ज्येष्ठांना अध्यात्मिक समाधानाची पर्वणी - मुख्यमंत्री

By The Journalists
मुंबई विभागातून ८०० भाविक अयोध्येकडे रवाना , तीर्थदर्शनातून ज्येष्ठांना अध्यात्मिक समाधानाची पर्वणी - मुख्यमंत्री

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शनासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ योजना’ सुरु करण्यात आली आहे. तीर्थयात्रा अध्यात्मिक मानसिक समाधानाची बाब आहे. कोल्हापूर, जळगाव नंतर तीर्थदर्शनासाठी तिसरी ट्रेन मुंबईतून आज रवाना होत आहे. योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यातून तीर्थ दर्शनासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्र दर्शनातून अध्यात्मिक व मानसिक समाधानाची पर्वणी ज्येष्ठ नागरिकांना मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संदेशामधून केले. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी विशेष ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून आज रवाना झाले. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या तीर्थयात्रेकरुंच्या प्रवासाला सुरूवात झाली. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर साकारले आहे. प्रभू रामाचे दर्शन घेण्याची संधी या यात्रेच्या निमित्ताने आपल्या यात्रेकरूंना मिळते ही भाग्याची गोष्ट असून याचे समाधान वाटते. पुढील काळात शेगाव, पंढरपूर बोधगया, दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणीही या तीर्थदर्शन यात्रेचे नियोजन केले जाणार आहे. ही योजना पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यातून निवडलेला लाभार्थी हा भारतातील एकूण ७३ तर राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांना भेटी देणार आहेत. ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास तसेच ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’तून वृद्धावस्थेत उपयुक्त उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयांचे सहाय्य शासनाने दिले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते गोपीचंद देसाई, चंद्रभागा वरेकर या यात्रेकरूंना प्रातिनिधिक स्वरूपात तिकीट देण्यात आले. मंत्री श्री.केसरकर यांनी रेल्वेच्या डब्यात जावून प्रवासी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत तीर्थयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्ह्यातून 150, मुंबई उपनगर या जिल्ह्यातून 306 व ठाणे जिल्ह्यातून 471 अर्ज अयोध्येला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यातून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी आज रवाना झाले आहेत. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातून ज्येष्ठ नागरिकांचे दिक्षाभूमी नागपूर, अजमेर, महाबोधी मंदीर गया, शेगाव, पंढरपूर या तीर्थ क्षेत्रासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून 2505 अर्ज प्राप्त झाले आहेत. यासंबंधी नियोजन सुरू असल्याची माहिती मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, वंदना कोचुरे यांनी दिली. तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी पाणी,चहा, बिस्कीट, नाष्टा, जेवण ही व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेकरूंना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून त्यांच्या सोबत वैद्यकीय पथक, इतर सहायक पथक सोबत असणार आहे. यात्रेकरू अयोध्या दर्शनासाठी जात असल्यामुळे राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभुषेत कलाकार मंचावर होते,पारंपरिक नृत्य यावेळी सादर करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, आय.आर.सी. टी .सी चे गौरव झा, सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे उपस्थित होते.

राष्ट्रीय
सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक  - ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...

नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई
मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा सोना जप्त

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...

मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण, सरकारकडे मदतीची मागणी

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...

भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक

मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीनांचा मृत्यू

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...

मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसई विरार
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...

वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...

वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला

वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Sports
...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

More Local News To You

Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.

Trending In Business
Trending In Business

Stay Connected

top-ad-banner
For You
वसई विरार
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...

वसई विरार
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार

वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...

वसई विरार
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू

वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...