अनंत चतुदर्शीला गणपती बाप्पाला गणेशभक्तांचा भावपूर्ण निरोप महापालिकेच्या चोख नियोजन व्यवस्थेमुळे, गणपती विसर्जन सुरळीतपणे संप्पन्न

विरार : मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी वसई विरार शहरात गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. मंगळवारी एकूण ३ हजार ४६० गणेश मूर्तींचे विसर्जन झाले, त्यापैकी १ हजार ६३३ कृत्रिम तलावात झाले. यात १ हजार ५५८ घरगुती गणेश आणि ७५ सार्वजनिक गणेश मूर्ती होत्या. म्हणजेच ऊर्वरीत १ हजार ८२७ मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक तलावात, खाडी आणि समुद्रात झाले. अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाच्या दिवशी वसई विरार शहर महानगरपालिकेने केलेले नियोजन आणि भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सोयीसुविधा यामुळे विसर्जन सोहळा शिस्तबध्द, शांततेत आणि भक्तीमय वातावरणात संप्पन्न झाला.
मंगळवारी, वसई विरार मध्ये अनंत चतुर्दशीला सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जन मिरवणुका निघाल्या. महानगरपालिकेचे साडेतीन हजारांहून अधिक मनुष्यबळ विसर्जनाच्या व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले होते. नागरिकांना विसर्जनाचे स्थळांची माहिती सहज मिळावी यासाठी जिओ टॅग लोकेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने ३ ठिकाणी जेट्टीच्या ठिकाणी विशेष तयारी बरोबर बोटी आणि तराफे अशी विसर्जनाची सुविधा केली होती. त्याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी नियोजन पाहाणी करत होते. निर्माल्य तलवात आणि नदीत विसर्जित करू नये यासाठी जागोजागी निर्माल्य कलश सुद्धा ठेवले ठेवण्यात आले होते. अग्निशमन विभागाच्या वतीने समुद्र किनारी विसर्जनस्थळी लाईफ जॅकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात ठेवण्यात आली होती.यासह जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. विसर्जन ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे ही बसविण्यात आले होते. विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे दोन्ही अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व प्रभागातील सहाय्यक आयुक्त यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी असे साडेतीन हजार मनुष्यबळ उपलब्ध होते. विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार मिळावे यासाठी वैद्यकीय आरोग्य विभागाकडून प्रभाग निहाय आरोग्य पथके ही विसर्जन स्थळी नियुक्त करण्यात आली होती. याशिवाय १५ रुग्णवाहिका आणि जागोजागी फिरत्या शौचालयाचीं सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.
कृत्रिम तलावात ५८.९१ टक्के विसर्जन
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावा यासाठी पालिकेने विसर्जनासाठी ५८ ठिकाणी १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. तर २ बंद असलेल्या दगड खाणींच्या ठिकाणी कन्वेअर बेल्टची सुविधा उपलब्ध करून दिली होती. वसई विरार मधील गणेशभक्तांनी महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. गणेशोत्सवाच्या एकूण १० दिवसांच्या काळात दीड दिवसीय, पाच दिवसीय, गौरी-गणपती, सात दिवसीय आणि अनंत चतुर्दशी या विसर्जनादरम्यान एकूण ३३ हजार ७०१ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले, यात १९ हजार ८५३ मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या. एकूण १९ हजार ५१८ घरगुती आणि ३३५ सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात झाले. म्हणजेच दहा दिवासात एकूण विसर्जनाच्या ५८.९१ टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात झाले.

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...
नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...
मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...
भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...
मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला
वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
Stay Connected
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...