top_advertise_img

विरार-चिखलडोंगरीत नवीन सब-स्टेशनसाठी आमदार क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन; महापारेषणचे अभियंता ननावरे यांनी व्यक्त केले आभार

By The Journalists
विरार-चिखलडोंगरीत नवीन सब-स्टेशनसाठी आमदार क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन; महापारेषणचे अभियंता ननावरे यांनी व्यक्त केले आभार

विरार:विरार-चिखलडोंगरी येथील सब-स्टेशनकरताचे भूसंपादन अनेक कारणांमुळे रखडले होते. मात्र तहसील कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत प्रत्यक्ष भेटी घेऊन, फोन करून आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यातील अडचणी दूर केल्या. त्यांच्या या सहकार्यामुळेच या सब-स्टेशनच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. या सब-स्टेशनच्या निर्मितीत आमदारांचा सिंहाचा वाटा आहे. अमूल्य योगदान आहे,` अशी माहिती देत महापारेषणचे अधीक्षक अभियंता मोहन ननावरे यांनी आमदारांप्रति आदर व्यक्त केला. 

विरार-चिखलडोंगरी येथील महावितरणच्या प्रस्तावित 222 केव्हीच्या सब-स्टेशनचे भूमिपूजन आज (18 सप्टेंबर) रोजी दुपारी लोकनेते तथा आमदार आमदार हितेंद्र ठाकूर आणि महावितरण व महापारेषणच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी महापारेषणचे अधीक्षक अभियंता मोहन ननावरे यांनी या कामाविषयी उपस्थितांना माहिती दिली. तब्बल 167 कोटी रुपये खर्चाच्या या सब-स्टेशनचे काम येत्या 24 महिन्यांत मार्गी लागेल. या कामात काही अडथळा येणार नाही. कारण आमदार द्वयींनी हे काम आधीच सुकर करून दिलेले आहे. परंतु त्यानंतरही अडचण आलीच; तर आम्ही पुन्हा सहकार्यासाठी आपल्या दारात येऊ; पण दिलेल्या वेळेत काम पूर्ण करू, अशी ग्वाहीही अधीक्षक अभियंता मोहन ननावरे यांनी या वेळी दिली. 

या विद्युत केंद्रातून पुढील दीड ते दोन वर्षांत वसई सर्कलला 100 मेगावॉट वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वसई-विरारची बहुतांश वीज समस्या निकाली निघेल, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला. याशिवाय सोपारा वीज केंद्रात 100 मेगावॉट क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. पुढील महिन्यात अजून 50 मेगावॉट क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. तसेच वसई पूर्वेला कामण, सुरक्षा स्मार्ट सिटी व विरार-कोपरी येथे अजून तीन विद्युत केंद्रे (सब-स्टेशन) येत्या 2 ते 3 वर्षांत कार्यान्वित होतील, अशी माहितीही उपस्थित अधिकाऱ्यांकडून या वेळी देण्यात आली.

या भूमिपूजन सोहळ्याला माजी महापौर नारायण मानकर, माजी स्थायी समिती सभापती जितूभाई शहा, माजी सभापती अजीव पाटील, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, माजी नगराध्यक्ष कांता पाटील, माजी नगरसेवक रंजन पाटील, वामन पाटील, माजी सरपंच रामचंद्र मेहेर, गोवालिज इंडस्टियल असोसिएशनचे अशोक ग्रोव्हर, अशोक कुलास, किशोर शेट्टी, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता महेश भागवत, महापारेषणचे कार्यकारी अभियंता योगेश पोलपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
अधिकारी-कंत्राटदारांसोबत बैठक घेणार!:आमदार हितेंद्र ठाकूर

गावकरी आणि सर्वांच्या सहकार्याने 167 कोटी खर्चाच्या 222 केव्ही सब-स्टेशनचे काम आज मार्गी लागले आहे, अशा शब्दांत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आनंद व्यक्त  केला. या सब-स्टेशनच्या जमीन संपादनात आमची भूमिका राहिली असली तरी आमच्यापेक्षा अधिकाऱ्यांनी या कामाचा पाठपुरावा करणे अधिक अपेक्षित होते. पण अधिकारी एकमेकांना नाचवण्यात आणि आपली पॉवर दाखवण्यात धन्यता मानतात. तेव्हा आम्हाला मध्ये पडावं लागतं, अशी खंत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केली.  अशा लोकोपयोगी कामांत असे व्यत्यय येऊ नयेत, किंबहुना ही कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. या सब-स्टेशनचे काम लवकर लवकर मार्गी लागावे, यासाठी येत्या चार दिवसांत या कामासंबंधी आपण पुन्हा एक बैठक घेऊ. या माध्यमातून संबंधित सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून तांत्रिक अडचणी समजून घेऊ. आम्ही आपल्या सहकार्याकरता नेहमीच तत्पर आहोत, अशा शब्दांत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना विश्वास दिला. केवळ उद्घाटन केले व नारळ फोडला असे होता कामा नये, असे सांगत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या कामासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य!:आमदार हितेंद्र ठाकूर

विरार-चिखलडोंगरी येथील सब-स्टेशनचे काम मार्गी लागण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. त्यांना या कामाची, त्याच्या निविदा प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती होती. त्यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयांमुळेच हे काम मार्गी लागत आहे, अशा शब्दांत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. याशिवाय त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीला उपस्थित बहुजन विकास आघाडीचे सर्व सहकाऱ्यांचेही या कामात योगदान असल्याचे आमदार ठाकूर म्हणाले. भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते व अधिकाऱ्यांना माहिती असावी, यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सब-स्टेशन निर्मितीमागचे हे गुपित उघड केले.

राष्ट्रीय
सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक  - ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...

नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई
मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा सोना जप्त

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...

मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण, सरकारकडे मदतीची मागणी

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...

भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक

मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीनांचा मृत्यू

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...

मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसई विरार
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...

वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...

वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला

वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Sports
...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

More Local News To You

Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.

Trending In Business
Trending In Business

Stay Connected

top-ad-banner
For You
वसई विरार
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...

वसई विरार
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार

वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...

वसई विरार
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू

वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...