top_advertise_img

लॉरियल पॅरिसतर्फे आलिया भट यांची जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदी नियुक्ती

By The Journalists
लॉरियल पॅरिसतर्फे आलिया भट यांची जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदी नियुक्ती

मुंबई:लॉरियल पॅरिस या जगातील पहिल्या क्रमांकाच्या ब्युटी ब्रँडने आलिया भट यांची जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदी नियुक्ती जाहीर केली आहे. यामुळे आलिया यांचा व्हायोला डेव्हिस, जेन फोंडा, इवा लॉन्गोरिया, केंडल जेनर, एले फॅनिंग, कॅमिला कॅबेलो या व अशा प्रवक्त्यांमध्ये समावेश झाला आहे. पुरस्कार विजेती अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजक असलेल्या आलिया या फ्रेंच ब्युटी ब्रँडच्या सप्टेंबर २०२४ पासून सुरू होत असलेल्या कॅम्पेनमध्ये दिसतील. टाइम मासिकाने जाहीर केलेल्या २०२४ मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेल्या आलिया यांनी विविध भाषा आणि प्रकारच्या सिनेमांत काम करत अनेक मान-सन्मान आणि समीक्षकांचे कौतुक मिळवले आहे. खऱ्या अर्थाने बहुगुणी असलेल्या आलिया यांचे व्यक्तिमत्त्व लॉरियल पॅरिसच्या मूल्यांशी सुसंगत असून त्याही सर्वसमावेशकता, सक्षमता, जगभरातील इतर स्त्रियांबरोबर आत्मविश्वासाची ताकद शेअर करणाऱ्या आहेत. ‘भारतीय अभिनेत्री आलिया भट यांचे परिवारात स्वागत करताना लॉरियल पॅरिसला आनंद होत आहे. आलिया यांनी जागतिक व्यासपीठाच्या मदतीने कशाप्रकारे सिनेमा क्षेत्रात सर्वसमावेशकता आणली आणि भारतीय सिनेमाला जगभरात पोहोचवले हे कौतुकास्पद आहे. पृथ्वी आणि इथल्या लोकांप्रती वाटणारा त्यांन वाटणारा जिव्हाळा लक्षात घेता त्या स्त्री गुणवत्ता, उद्योजकता आणि स्त्रियांना नव्या उंचीवर नेण्यासाठी लॉरियल पॅरिस देत असलेल्या संधींचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सर्वात योग्य अ‍ॅम्बेसिडर आहेत,’ असे लॉरियल पॅरिसच्या जागतिक अध्यक्ष डेल्फीन विगुएर-होवास म्हणाल्या. ‘लॉरियल पॅरिस कुटुंबात सहभागी होत कणखर, सामर्थ्यशाली स्त्रियांसह उभं राहाताना मला आनंद होत आहे. त्वचेशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये रस असणारी व्यक्ती या नात्याने मला लॉरियल पॅरिसची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सौंदर्य क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली गुणवत्ता उल्लेखनीय वाटते. स्त्रीच्या सक्षमतेला चालना देण्याचे ब्रँडचे प्रयत्न मला जवळचे वाटतात, कारण त्यामुळे प्रत्येक स्त्रीला आपल्या ताकदीची नव्याने जाणीव होते. लॉरियल पॅरिससह सौंदर्य क्षेत्रात सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी आणि स्त्रियांना सर्वसमावेशकतेचा अनुभव देण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असे आलिया भट म्हणाल्या. आलिया भट यांच्याविषयी : विविध भूमिकांचे यशस्वी सादरीकरण करत आलिया भट यांनी समीक्षकांचे कौतुक आणि बॉक्स ऑफिस कमाईचा दुर्मील समतोल साधला आहे. गेल्या केवळ तीनच वर्षांत त्यांच्या प्रत्येक सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील पहिल्या दहा सिनेमांत स्थान मिळवले आहे. वास्तविक आणि अभिजात गोष्टींना वाव देणारी त्यांची निर्मिती संस्था – इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन्स २०१९ मध्ये लाँच करण्यात आली होती. निर्माती या नात्याने त्या दमदार कथांच्या मदतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे तसेच त्यांच्या भावनांना साद घालण्याचे त्यांचे ध्येय आहे. हे करताना त्यांना मनोरंजन क्षेत्रात स्त्रियांना समान वाव मिळावा म्हणून त्या प्रयत्नशील असतात. नेटफ्लिक्सवरील त्यांचा पहिला सिनेमा ‘डार्लिंग्ज’ केवळ दोन आठवड्यांत नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेलेला इंग्रजीइतर कंटेंट ठरला होता. त्यानंतर एमी विजेते दिग्दर्शक रिची मेहता आणि क्यूसी, रिची मेहता व आलिया भट यांची निर्मिती असलेली त्यांची अमेझॉन प्राइम व्हिडिओ सीरीज पोचरही लोकप्रिय झाली. लाखमोलाचं स्त्रीत्व आलिया भट यांचा टाइम मासिकाच्या २०२४ मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यांचा फोर्ब्जच्या ३० अंडर ३० तसेच भारतीय व्यवसायातील सर्वात सामर्थ्यशाली ५० स्त्रियांच्या यादीतही समावेश झाला होता. भारतातील सर्वात आघाडीवर असलेल्या पाच इन्स्टाग्राम अकाउंट्समध्ये आलिया भट यांचा समावेश असून आपल्या ८५ लाख फॉलोअर्ससह त्या पर्यावरण आणि सामाजिक प्रगतीविषयी प्रसार करत असतात. पर्यावरणपूरक जीवनशैलीशी बांधिलकी जपत त्यानी एड-ए-ममा हा शाश्वत कपड्यांचा ब्रँड तयार केला असून त्याद्वारे लहान मुलांमध्ये पर्यावरणाचे प्रेम निर्माण करण्याचे ध्येय आहे. पृथ्वी आणि लहान मुलांविषयी वाटणाऱ्या प्रेमाचा संगम त्यांनी यात साधला आहे.

राष्ट्रीय
सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक  - ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...

नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई
मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा सोना जप्त

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...

मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण, सरकारकडे मदतीची मागणी

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...

भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक

मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीनांचा मृत्यू

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...

मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसई विरार
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...

वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...

वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला

वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Sports
...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

More Local News To You

Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.

Trending In Business
Trending In Business

Stay Connected

top-ad-banner
For You
वसई विरार
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...

वसई विरार
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार

वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...

वसई विरार
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू

वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...